t delightfulheart: मार्च 2023

मंगळवार, २८ मार्च, २०२३

विनायक दामोदर सावरकर

सावरकर, विनायक दामोदर सावरकर, विनायक दामोदर : (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर म्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते. १८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक ⇨ श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१)साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य. लंडनमध्ये असताना विहारी आणि काळ ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८). ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या. १८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले. लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले ⇨ सेनापती बापट ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्‌यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता. ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्‌स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली. सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११). सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले. १९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या. अस्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्‌गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले. सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या. सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता. सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते. ‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या. दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी तसे घडले. भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला. त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे. सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप (१९२७), संन्यस्त खड्‌ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्‌मय (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे. मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्‌मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्याअखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली. संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३. २. कीर, धनंजय अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३. ३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे, १९७०. ४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३. ५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०. ६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४. कुलकर्णी, अ. र.

शनिवार, ४ मार्च, २०२३

free web तयार करा

 👉👉सर्व प्रथम ब्राउझर वर टाइप करा weebly .com.


आता weebly ची वेबसाईट Open होईल.

👉👉आपल्या कडे face book account असेल तर face book वर साइन करून सुरवात करू शकता.
नसेल तर Gmail  ने सुरु करु शकता.

👉👉प्रथम आपले पूर्ण नाव टाका.
नंतर email टाका. नंतर password टाका. 

👉👉तद्नंतर  साइन अप फ्री वर क्लिक करा.

👉👉आता आपण weebly मध्ये login असाल.

👉👉स्वत:च्या वेबसाईट साठी प्रथम आपल्याला थीम select करावी. 

👉👉आपली वेबसाईट कशी दिसावी यासाठी.
वेगवेगळ्या थीम दिसतील. आपल्याला योग्य असेल अशी थीम select करा.

👉👉आता weebly मध्ये option येतील.त्यात  Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.

👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.
त्यातील  box मध्ये आपल्याला हवा असलेला address type करा आता continue वर क्लिक करा.

👉👉तद्नंतर Build may Site वर क्लिक करा.

👉👉आता आपली वेबसाईट कशी असेल हे दिसून येईल. आपण येथे हवा तसा बदल करू शकता.

👉👉My Site आपल्याला हवे असलेले नाव टाका उदा. मी माझा .nishant wakodkar. 

👉👉तेथे आपण Logo हि टाकू शकतो.आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
त्याखाली एक चित्र असेल तर तेही आपण आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.

👉👉यात आपण एका पेक्षा जास्त फोटो अपलोड करू शकतो.

👉👉आता आपली वेबसाईट दिसून येईल त्याखाली आपण काही मजकूर टाकू शकतो .प्रथम आपण शीर्षक टाकू या. 

👉👉उजव्या बाजूला text चे बरेच options दिसून येतील. ते ड्रग करून आपण वेबसाईट रचना करु शकतो.

👉👉Text मध्ये आपण माहिती भरु शकतो त्याचा 
आकार बदलू शकतो. रंग बदलू शकतो.

👉👉आपल्या पसंती नुसार येथे मजकूर टाकू शकतो.     
👉👉उजव्या बाजूला वरती face book , tweeter यासारखे option दिसतील त्याच्या शेजारी.आपण 
आपल्याला हवा असलेला.हेडलाईन टाकू शकतो.   

👉 👉 आपल्या  वेबसाईटला सोशल बेब वर आपण लिंक करू शकतो.यात आपण सोशल मेडिया add करू शकतो.

👉👉याचा फायदा असा होतो कि जे आपल्या वेबसाईटला सर्च करत असतील ते या सोशल मेडीयातून  आपल्याशी संपर्क करू शकतील.

👉👉आता शेवटची स्टेप वरती उजव्या बाजूला PUBLISH या बटनावर क्लिक करा.

👉👉आत्ता आपल्यास पुन्हा विचारले जाईल कि,आपल्या जवळ Domain आहे का ? Register a New Domain यावर क्लिक करू नका .

👉👉रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.    

👉👉आता नवीन window येईल.Categorize Your Website मध्ये Select website type वर क्लिक करा.त्यात.personal,Bisiness,Educational असे अनेक options येतील.

👉👉त्यातील आपण Educational select करू या.त्यात Informational आपण select करूयात. 

👉👉तद्नंतर Continue वर क्लिक करा.    
👉👉आता आपले account व्हेरीफाय बाबत विचारले जाईल.त्यात click to Continue वर क्लिक करूयात.  

👉 👉आता शेवटी आपल्याला आपल्या देशाचे नाव टाकायचे आहे.
नंतर आपला मोबाईल नंबर  टाकून submit वर क्लिक करायची आहे.
👉👉आता आपल्या मोबाईलवर एक SMS आला असेल त्यातील अंक box मध्ये टाकून submit वर क्लिक करायची आहे.

👉👉आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल You’ve successfully verifild your account ! म्हणजे आपली वेबसाईट पूर्ण झाली.    

 👉👉आता
 click here to continue वर क्लिक करा. 

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

   .


.इसवी सनापूर्वी पंधराशे वर्ष वेदांग ज्योतिष हा ग्रंथ लिहिला गेला.  शास्त्रावरील हा सर्वात प्राचीन ग्रंथ आपल्या देशावरील आक्रमणामुळे नालंदा तक्षशिला यासारखी विद्यापीठे व विद्यालये जाळली गेली. लक्षावधी ग्रंथ आगीच्या भक्षस्थानी पडले व त्यानंतर सुमारे 1000 वर्षे भारतीय संस्कृतीतील विद्योपासना खंडित झाली . काही मनस्वी भारतीयांनी काही ज्ञान मोखोद्गत केले होते , तरी २००० वर्षात खगोलशास्त्रावर एकही ग्रंथ उपलब्ध झाला नाही.  इसवी सन 499 साली  वयाच्या 23 व्या वर्षी आपण हा ग्रंथ लिहिला असे आर्यभट्ट यांनी स्वतःच लिहून ठेवले आहे म्हणजे 1999 साली या ग्रंथाला पंधराशे वर्षे पूर्ण होतात.

    आर्यभट्ट कुसुमपूर म्हणजे मगध साम्राज्याची राजधानी,  आजचे पाटणा शहर.  येथे जन्मलेले सिद्धांतांनी दिलेल्या पद्धतीने केलेले गणित आणि ग्रहांच्या अवस्था, ग्रहणे व प्रत्यक्ष निरीक्षण यात एक वाक्यता नाही असे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष सूर्याने त्यांचे गुरुत्व स्वीकारून त्यांना ज्ञान दिले .  सूर्यकेंद्रीत ग्रहमाला हा गॅलिलिओचा सिद्धांत सत्य ठरतो.  अख्यायिकेला  सत्याचा आधार मिळतो, आर्यभट्ट हे नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू असावे .   

          आर्यभट्ट वेदांत ज्योतिष हा ग्रंथ फक्त 121 आर्यांचाच आहे.  गितिकापाद, गणित पाद , काल-क्रियापाद,  गोलपाद अशा चार भागात हा ग्रंथ विभागला गेला आहे.  सारा ग्रंथ सूत्रमय भाषेत लिहिलेला आहे.  खगोलशास्त्राची मूलभूत माहिती त्यात दिली आहे.

       ग्रहांचे व नक्षत्रांचे आवर्तनीय काल अचूक दिले आहेत . अन्य गणित हे असेच अचूक दिले आहेत,  पण या वैज्ञानिकाचे जीवन चरित्र मात्र अन्य ऋषीमुनी प्रमाणे अज्ञातच राहिले आहे, तरी त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाची अनुभूती आधुनिक शास्त्रज्ञांना प्रकर्षाने येत आहे 15 एप्रिल 1975 साली 1500 व्या जयंतीचे निमित्ताने आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला गेला.

 



जन्म 30 नोव्हेंबर 1858 ( विक्रमपूर बंगाल)  मृत्यू 23 नोव्हेंबर 1937 (गिरिती बंगाल)  78 वर्ष

     ढाका जिल्ह्यातील विक्रमपूर परगण्यात फरितपूर या गावी दिनांक 30 नोव्हेंबर 1858 साली जगदीश चंद्रांचा जन्म झाला.  लहानपणी भगवान चंद्रांनी जगदीशच्या  वडिलांनी एक अटल गुन्हेगाराला कारावासाची शिक्षा दिली होती व पुढे त्यालाच त्यांनी आपल्या घरी नोकर म्हणून ठेवले. त्याने लहानपणी बुद्धिमान जगदीशला आपल्या पूर्व जीवनातील चित्त थरारक आठवणी वन्य जीवन,  पशुपक्षी , वनस्पती यांच्या गोष्टी सांगितल्या सभोवताच निसर्गप्रेमी जगदीशचे मन वन्यजीवनाने भारून गेले व पुढे ते निसर्ग निरीक्षक बनले.  कलकत्त्याला त्यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.  जीवशास्त्र व वनस्पतीशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांनी खाईष्ट कॉलेजमध्ये नाव नोंदवले 1884- 85 सालात ते केंब्रिज व लंडन विद्यापीठाचे पदवीधर झाले,  त्यांचे प्रारंभिक संशोधन विद्युत लहरींचे होते एका प्रयोगात त्यांनी 75 फूट अंतरावर असणारी घंटा मध्ये तीन भिंती असताना विद्युत लेण्यांच्या साह्याने वाजून दाखवली.  मार्कोनीचे नोबेल प्राईज त्यांना मिळाले असते पण परतंत्र भारतात त्यांना आर्थिक साह्यासाठी शासनाची मदत मिळाली नाही.  त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले. पॅरीस येथील जागतिक विज्ञान परिषदेत त्यांनी सजीव आणि निर्जी यातील साम्य या विषयावर आपला प्रबंध वाचला त्यामुळे पुढे रडारचा शोध पाश्चात्य वैज्ञानिकांनी लावला जगदीश चंद्रांनी एका प्रयोगात एक पान,  एक गाजर व एक नवलकोल यात सौम्य विद्युत प्रवाह सोडला व वनस्पती मधून उमटणारी प्रतिक्रिया अभ्यासली व प्राण्याप्रमाणे वनस्पतींनाही संवेदना असते हे सिद्ध .  क्लोरोफॉर्म मुळे वनस्पतींना गुंगी येते, मुळाशी मद्य ओतलं तर पाणी उत्तेजित होतात. विषप्रयोगाने रोपटी मारतात.

वनस्पती विश्वात संशोधन करताना लागणारी अत्यंत तरल संवेदनाक्षम काटेकोर अचूक वेध घेणारे उपकरणे त्यांनी स्वतः तयार केली होती,  कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था काढली.  27 नोव्हेंबर 1937 साली या विज्ञाननिष्ठ कर्मयोग्याने जगाचा निरोप घेतला तेव्हा वृक्षवेलींनी दुःखाचे निश्वास सोडले.

 



जन्म 21 फेब्रुवारी 1894 (शहापूर)-  मृत्यू एक जानेवारी 1955 (दिल्ली) 60 वर्ष

 एका सामान्य घराण्यात 1895 साली श्री शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म झाला . त्यांच्या जन्मानंतर अवघ्या आठ महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि तो मुलगा आईसह मामाच्या घरी वाढला.  मामाने व आजोबांनी त्याचे पालनपोषण केले. त्याची बुद्धिमत्ता आणि शास्त्रीय विषयांची आवड पाहून त्यांनी त्याला शिक्षणासाठी लाहोरला आणले. जात्यात बुद्धिमान व परिस्थितीची जाणीव असणारा हा मुलगा एमएससी झाला व शिष्यवृत्ती मिळून इंग्लंडला गेला. इंग्लंडहून परतल्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक नेमले. शिकविण्याचे काम आटोपताच फावल्या वेळात त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टर प्रफुलचंद्र रे,  डॉक्टर सी व्ही रामन यांनीही त्यांच्या लॅबोरेटरीला भेट दिली.

 भारतात त्यांनी अनेक ठिकाणी वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू केल्या म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय ठरले.  नंतर त्यांना पंजाब युनिव्हर्सिटीने रसायन शास्त्राचे प्रमुख संचालक नेमले . त्याच काळात औद्योगिक संशोधन विषयक संस्था कलकत्ता येथे स्थापन झाली आणि डॉक्टर भटनागर यांना तिथे प्राचार्य म्हणून बोलवण्यात आले. 1941 साली त्यांना इंग्रज प्रशासनाने त्यांच्या शास्त्र संशोधन कार्यात बद्दल सर ही पदवी दिली.

स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांना भारताची औद्योगिक प्रगती झपाट्याने भावी असे वाटत होते.  त्यासाठी त्यांनी “सायंटिफिक कौन्सिल ऑफ शास्त्र व उद्योग” याचची स्थापना केली व त्या कौंसीलच्या चेअरमन पदी डॉक्टर भटनागर यांची नेमणूक केली.  मरेपर्यंत त्या संस्थेचे चेअरमन होते.  एका सामान्य घराण्यात जन्मलेल्या मुलाने स्वकर्तृत्वाने देशाच्या विकास कार्यासाठी आपले सारे जीवन व्यतीत केले.  देशसेवेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. विधायक वृत्तीने लोकसेवा करून देशाची शान वाढविता येते याचे डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर हे ज्वलंत उदाहरण आहे.  भारतीय संस्कृतीचा उदात्त विचार म्हणजे शांतीस्वरूप भटनागर यांचा जीवन प्रवाह असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, 1955 साली त्यांचे निधन झाले.

 



जन्म 7 नोव्हेंबर 1888(  तिरुचिरापल्ली)  मृत्यू 21 नोव्हेंबर 1970 ( बंगलोर) ८२ वर्षे

दिनांक 7 नोव्हेंबर 1888 रोजी त्यांचा जन्म झाला 1900 साली  वयाच्या 12 व्या वर्षी ते मॅट्रिक झाले.  1904 मध्ये बी.ए.  व 1907 मध्ये एम.ए. झाले . गणित आणि भौतिकशास्त्र हे त्यांचे विषय व त्यात त्यांनी पहिल्या वर्गात पहिला क्रमांक मिळविला यावरून त्यांची निसर्ग दत्त बुद्धिमत्ता दिसून येते.  त्यांचे अनेक लेख इंग्लंडमधील वृत्तपत्रात मासिकात प्रसिद्ध झाले . 1921 सालीच्या कॉमनवेल्थ विश्वविद्यालयाच्या परिषदेत त्यांनी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.

क्वांटम सिद्धांताला बळकटी देणारा शोध म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणाचा कण-  प्रोटॉन आपली सर्व ऊर्जा इलेक्ट्रॉनला देऊ शकतो,  यावर भारतीय संशोधक चंद्रशेखर रामन यांनी केलेले संशोधन अतिशय महत्त्वाचे ठरले व फार उपयोगी सिद्ध झाले. पारदर्शक पदार्थातून जवळपास एकाच तरंग लांबीच्या म्हणजे एकाच रंगाच्या प्रकाशाचे विकरण झाल्यास त्यात मोर्चा तरंग लांबीपेक्षा अधिक इतर तरंगलांबीचे किरणही आढळतात हा शोध त्यांनी लावला व त्याचा अर्थही लावला.

 पदार्थातील रेणू आपल्या असाभोवती वेगाने गिरक्या घेत असतात तसेच रेणूमधील अणूंची एकमेकांच्या संदर्भात जलद कंपनेही होत असतात त्या गिरक्यात कंपने ही असतात त्या कंपनात ऊर्जा असते , या ऊर्जेची देवाण-घेवाण झाल्यामुळे प्रकाशाच्या तरंगाची लांबी कमी जास्त होऊ शकते.  या वाढ - घटीचे अचूक मोजमाप घेऊन रेणूच्या संरचनेचा चांगला अभ्यास करता येतो. रामन परिमाण वापरून रेणूच्या सरचनेची धाटणी ठरविण्याचे काम अनेक शास्त्रज्ञांना प्रेरणादायक ठरले दोन पिढ्यापूर्वीचे  भौतिक शास्त्रज्ञ एकतर त्यांचे विद्यार्थी होते वा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भरलेले होते.  

        ध्वनी शास्त्रातही त्यांनाही मूलभूत काम केले डोळ्यांना रंग कसे दिसतात आकाशाचा रंग निळा का असल्या रहस्यमय कठीण प्रश्नांची उकल करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला या संशोधन कार्याबद्दल 1930 सालचा नोबेल पुरस्कार त्यांना गौरवपूर्वक बहाल करण्यात आला तर 1954 साली  त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

 असा हा फुले, मुले, ग्रह, गोल , तारे, रंगबिरंगी खडे, हिरे, मोती यांचे आकर्षण असणारा बुद्धिमान गाण रसिक प्रसरण सर्हदयी उदारमतवादी विज्ञानवेता 21 नोव्हेंबर 1970 साली समाधीस्थ झाला.




 जन्म 12 नोव्हेंबर 1896 (मुंबई) -  मृत्यू 27 जून 1987 ( मुंबई)  90 वर्ष

        केवळ पशुपक्षी पाळणारे अनेक लोक आपल्याला आढळतात पण प्रत्येक पक्षाची व प्राण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण जीवन कहाणी आहे ती जीवन कहाणी जाणणारे सलीम अली हे असेच एक भारतीय पक्षी विज्ञान वित्ते म्हणून जगात प्रसिद्ध आहेत.  12 नोव्हेंबर 1896 साली सलीम अलींचा जन्म झाला,  वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना रानावनात भटकण्याची व पशुपक्ष्यांचे जीवन पाहण्याची चटक लागली हीच त्यांची जन्मजात आवड ठरली.  निसर्गाच्या रम्य मोकळ्या वातावरणात भटकताना हे पक्षी जीवन न्याहाळण्याची  त्यांची जिज्ञासा वृत्ती  बळावली व त्यामुळे शालेय शिक्षणा ऐवजी बिनभिंतीच्या शाळेतच ते शिकू लागले.  वडिलांनी त्यांचा थोर थोरला मुलगा जो म्यानमार - ब्रह्मदेशात व्यापार करीत होता . त्यांच्या मदतीसाठी सलीम आले यांना पाठविले पण सलीमच्या मनात पक्षी बसले होते.  ब्रह्मदेशातून परतल्यावर सलीम या पक्षी जीवनाच्या अभ्यासात दंग झाले.  फासेपारध्याकडून व स्वतः निरीक्षण करून ते त्यात तज्ञ झाले. नंतर मुंबईच्या नॅचरल हिस्टरी संस्थेत गाईड म्हणून काम करू लागले. पुढे त्याच विषयाचे अधिक अध्ययन  करण्यासाठी ते जर्मनीत गेले . ते भारतात परत आले पण त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही.

      बॉम्बेपोर्ट नजीक एका घरात सलीम आली राहू लागले.  त्यांनी विणकर पक्षाच्या राहणीचा अभ्यास सुरू केला व 1930 साली त्या पक्षाच्या जीवनावरच एक शोध प्रबंध त्यांनी प्रकाशित केला व जग त्यांना पक्षी तज्ञ म्हणून ओळखू लागले.  त्यांनी केवळ याच पक्षी जीवनाचा अभ्यास न करता जगातील अनेक पक्षांच्या जीवनाचा अभ्यास सुरू केला त्यामुळे त्यांना भारत सरकारकडून व अन्य संस्थांकडून अनेक सन्मान प्राप्त झाले ते राज्यसभेचे सदस्य बनले.

      भारतात पक्षी हे पुस्तक त्यांनी 1941 साली लिहिले पाकिस्तान व भारतातील पक्षी जीवन या विषयावर 1948 साली दुसरी पुस्तक लिहिले, ही दोन्ही पुस्तके उत्कृष्ट पक्षी जीवनाविषयी लोकोत्तर माहिती देणारे आहेत.  त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे.  एकाच विषयाचा ध्यास घेऊन जीवनभर त्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याने किती दींगत कीर्ती मिळते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे . 20 जून 1987 साली त्यांची मुंबईत निधन झाले.




 जन्म 30 ऑक्टोबर 1909 ( मुंबई) -   मृत्यू 24 जानेवारी 1966 (फ्रान्स)  56 वर्षे

भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी सुसंस्कृत माणसे निर्माण झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर,  प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून, थोर विचारवंत म्हणून होमी जहांगीर भाभा यांचे नाव भारतात अत्यंत आदराने व प्रेमाने घेतले जाते.

              स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 साली झाला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा अणूयुगाने एक नवे पर्व जगात सुरू केले.  नागासाकी व हिरोशिमा ही जपान मधील दोन शहरे बेचिराख करून पाश्चात्य राष्ट्रने आपले वैज्ञानिक प्रगतीचे भयानक चित्र दाखवून दिले. अण्वस्त्राने किती भयंकर मानव संहार व हानी होऊ शकते याची एक उदाहरण दाखवून दिले. होमी भाभानी आपल्या संशोधनाला सुरुवात केली तेव्हा नवे मूल कण,  नवे सिद्धांत ,नवी तंत्रे उदयास आली होती.  त्यात भाभांनी भर घातली.  अंतराळातून येणाऱ्या विश्व किरणात समुद्रसपाटीला असलेल्या वातावरणातील कवच भेदून इलेक्ट्रॉन कसे पोहोचतात आणि विश्व किरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा तयार होतो याचा कॉस्केड थेअरीने उलगडा करण्यात त्यांनी यश मिळविले.

                      प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रॉनची पदार्थाची आंतरक्रिया होतास त्यातून गॅमा किरण बाहेर पडतात, त्या किरणामुळे इलेक्ट्रॉनिक्स पॉजिट्रॉन्स होतात. ही जोडी व त्यावर पुन्हा गॅमा किरण ही प्रक्रिया ऊर्जा क्षीण होईपर्यंत चालते,  पदार्थात इलेक्ट्रॉन वा पॉजीट्रॉंन  यांचे विकरण कसे होते याचा सिद्धांत मांडताना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार होणारी काल वृद्धी लक्षात घेतली पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले.  त्यांनी अनेक संस्था उभारल्या तुर्भे, तारापूर अणू  शक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मूलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग,  ऊर्जा आयोग  अवकाश संशोधन कॅन्सर संशोधन अशा मानव कल्याणकारी संस्थांमधून अनुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले.  भारत सरकारने 1954  साली पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.  20 जानेवारी 1966 रोजी विमान अपघातात त्यांचे निधन झाले.

Vikram Sarabhai

 



 जन्म 12 ऑगस्ट 1919 (अहमदाबाद) -  मृत्यू 30 डिसेंबर 1971 (तिरुअनंतपुरम)  52 वर्षे

      अंतरिक्षात भरारी मारणारा भारत असे आपण आज म्हणतो.  क्षेपणास्त्रे आर्यभट्ट सारखे उपग्रह अंतराळात सोडू शकतो.  स्वातंत्र्योत्तर काळातील हीच स्पृहणीय प्रगती ज्या माणसाने घडवून आणली तो अवकाश युगाचा आधुनिक आर्यभट्ट म्हणजे विक्रम साराभाई विज्ञान उच्च स्तरावर नेण्याचे कार्य या महापुरुषांनी केले.

          12 ऑगस्ट 1919 साली अहमदाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे उद्योगपतीचे होते.  स्वतः विक्रम भाईंना शास्त्र व गणित या विषयांची मूलत:च  आवड होती डॉक्टर होमी भाभांनी त्यांच्या पूर्वीच अंतराळ युगाचा वेध घेतला होता. ऍटोमीक एनर्जीचा विधायक कामासाठी कसा उपयोग करून घेता येईल यासंबंधी विक्रम साराभाईंचे सतत चिंतन चालले होते आंतरराष्ट्रीय ऍटोमिक एनर्जीच्या चौदाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते व त्याबद्दल शांतीस्वरूप भटनागर स्मृतिचिन्ह त्यांनी पटकावले.

            1962 साली त्यांनी पद्मविभूषण किताब देण्यात आला 1939 साली इंग्लंड मधील शिक्षण संपून ते भारतात परतले, त्यांनी प्रामुख्याने कॉस्मिक रेज अंतरिक्षेतून पृथ्वीकडे येणाऱ्या किरणाचे संशोधन आरंभिले व अनुशक्तीचा वापर कसा करावा याचा शोध घेतला. त्यांनी त्या विषयात पीएचडी ही पदवीही मिळवली. अहमदाबादला स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली व संशोधन सुरू केले. टोमिक  एनर्जी कमिशनचे चेअरमन पद त्यांच्याकडे चालून आले. थुंबा  ( तिरुअनंतपुरम ) येथे 1971 साली टोमिक  एनर्जी संशोधन आणि विकास केंद्र ही स्थापले.

          विमानाचे, अंतरिक्ष यानाचे उड्डाण यासाठी त्यांनी जीवाचे रान केले त्यांच्या या अविश्रांत परिश्रमाचे फळ म्हणजे आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अंतराळात झेपावला . विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी करावा अशीच त्यांची अंतरीक इच्छा होती. दिनांक 30 डिसेंबर 1971 साली त्यांचे थुंबा येथे हृदयविकाराने निधन झाले.