जन्म 30 ऑक्टोबर 1909 ( मुंबई) - मृत्यू 24 जानेवारी 1966 (फ्रान्स) 56 वर्षे
भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी सुसंस्कृत माणसे निर्माण झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर, प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून, थोर विचारवंत म्हणून होमी जहांगीर भाभा यांचे नाव भारतात अत्यंत आदराने व प्रेमाने घेतले जाते.
स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 साली झाला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा अणूयुगाने एक नवे पर्व जगात सुरू केले. नागासाकी व हिरोशिमा ही जपान मधील दोन शहरे बेचिराख करून पाश्चात्य राष्ट्रने आपले वैज्ञानिक प्रगतीचे भयानक चित्र दाखवून दिले. अण्वस्त्राने किती भयंकर मानव संहार व हानी होऊ शकते याची एक उदाहरण दाखवून दिले. होमी भाभानी आपल्या संशोधनाला सुरुवात केली तेव्हा नवे मूल कण, नवे सिद्धांत ,नवी तंत्रे उदयास आली होती. त्यात भाभांनी भर घातली. अंतराळातून येणाऱ्या विश्व किरणात समुद्रसपाटीला असलेल्या वातावरणातील कवच भेदून इलेक्ट्रॉन कसे पोहोचतात आणि विश्व किरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा तयार होतो याचा कॉस्केड थेअरीने उलगडा करण्यात त्यांनी यश मिळविले.
प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रॉनची पदार्थाची आंतरक्रिया होतास त्यातून गॅमा किरण बाहेर पडतात, त्या किरणामुळे इलेक्ट्रॉनिक्स पॉजिट्रॉन्स होतात. ही जोडी व त्यावर पुन्हा गॅमा किरण ही प्रक्रिया ऊर्जा क्षीण होईपर्यंत चालते, पदार्थात इलेक्ट्रॉन वा पॉजीट्रॉंन यांचे विकरण कसे होते याचा सिद्धांत मांडताना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार होणारी काल वृद्धी लक्षात घेतली पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी अनेक संस्था उभारल्या तुर्भे, तारापूर अणू शक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मूलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग, ऊर्जा आयोग अवकाश संशोधन कॅन्सर संशोधन अशा मानव कल्याणकारी संस्थांमधून अनुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. भारत सरकारने 1954 साली पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. 20 जानेवारी 1966 रोजी विमान अपघातात त्यांचे निधन झाले.


<< मुख्यपृष्ठ