जन्म 21 फेब्रुवारी 1894 (शहापूर)- मृत्यू एक जानेवारी 1955 (दिल्ली) 60 वर्ष
एका सामान्य घराण्यात 1895 साली श्री शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म झाला . त्यांच्या जन्मानंतर अवघ्या आठ महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि तो मुलगा आईसह मामाच्या घरी वाढला. मामाने व आजोबांनी त्याचे पालनपोषण केले. त्याची बुद्धिमत्ता आणि शास्त्रीय विषयांची आवड पाहून त्यांनी त्याला शिक्षणासाठी लाहोरला आणले. जात्यात बुद्धिमान व परिस्थितीची जाणीव असणारा हा मुलगा एमएससी झाला व शिष्यवृत्ती मिळून इंग्लंडला गेला. इंग्लंडहून परतल्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक नेमले. शिकविण्याचे काम आटोपताच फावल्या वेळात त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टर प्रफुलचंद्र रे, डॉक्टर सी व्ही रामन यांनीही त्यांच्या लॅबोरेटरीला भेट दिली.
भारतात त्यांनी अनेक ठिकाणी वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू केल्या म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय ठरले. नंतर त्यांना पंजाब युनिव्हर्सिटीने रसायन शास्त्राचे प्रमुख संचालक नेमले . त्याच काळात औद्योगिक संशोधन विषयक संस्था कलकत्ता येथे स्थापन झाली आणि डॉक्टर भटनागर यांना तिथे प्राचार्य म्हणून बोलवण्यात आले. 1941 साली त्यांना इंग्रज प्रशासनाने त्यांच्या शास्त्र संशोधन कार्यात बद्दल सर ही पदवी दिली.
स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांना भारताची औद्योगिक प्रगती झपाट्याने भावी असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी “सायंटिफिक कौन्सिल ऑफ शास्त्र व उद्योग” याचची स्थापना केली व त्या कौंसीलच्या चेअरमन पदी डॉक्टर भटनागर यांची नेमणूक केली. मरेपर्यंत त्या संस्थेचे चेअरमन होते. एका सामान्य घराण्यात जन्मलेल्या मुलाने स्वकर्तृत्वाने देशाच्या विकास कार्यासाठी आपले सारे जीवन व्यतीत केले. देशसेवेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. विधायक वृत्तीने लोकसेवा करून देशाची शान वाढविता येते याचे डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतीय संस्कृतीचा उदात्त विचार म्हणजे शांतीस्वरूप भटनागर यांचा जीवन प्रवाह असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, 1955 साली त्यांचे निधन झाले.


<< मुख्यपृष्ठ