.
.इसवी सनापूर्वी पंधराशे वर्ष वेदांग ज्योतिष हा ग्रंथ लिहिला गेला. शास्त्रावरील हा सर्वात प्राचीन ग्रंथ आपल्या देशावरील आक्रमणामुळे नालंदा तक्षशिला यासारखी विद्यापीठे व विद्यालये जाळली गेली. लक्षावधी ग्रंथ आगीच्या भक्षस्थानी पडले व त्यानंतर सुमारे 1000 वर्षे भारतीय संस्कृतीतील विद्योपासना खंडित झाली . काही मनस्वी भारतीयांनी काही ज्ञान मोखोद्गत केले होते , तरी २००० वर्षात खगोलशास्त्रावर एकही ग्रंथ उपलब्ध झाला नाही. इसवी सन 499 साली वयाच्या 23 व्या वर्षी आपण हा ग्रंथ लिहिला असे आर्यभट्ट यांनी स्वतःच लिहून ठेवले आहे म्हणजे 1999 साली या ग्रंथाला पंधराशे वर्षे पूर्ण होतात.
आर्यभट्ट कुसुमपूर म्हणजे मगध साम्राज्याची राजधानी, आजचे पाटणा शहर. येथे जन्मलेले सिद्धांतांनी दिलेल्या पद्धतीने केलेले गणित आणि ग्रहांच्या अवस्था, ग्रहणे व प्रत्यक्ष निरीक्षण यात एक वाक्यता नाही असे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष सूर्याने त्यांचे गुरुत्व स्वीकारून त्यांना ज्ञान दिले . सूर्यकेंद्रीत ग्रहमाला हा गॅलिलिओचा सिद्धांत सत्य ठरतो. अख्यायिकेला सत्याचा आधार मिळतो, आर्यभट्ट हे नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू असावे .
आर्यभट्ट वेदांत ज्योतिष हा ग्रंथ फक्त 121 आर्यांचाच आहे. गितिकापाद, गणित पाद , काल-क्रियापाद, गोलपाद अशा चार भागात हा ग्रंथ विभागला गेला आहे. सारा ग्रंथ सूत्रमय भाषेत लिहिलेला आहे. खगोलशास्त्राची मूलभूत माहिती त्यात दिली आहे.
ग्रहांचे व नक्षत्रांचे आवर्तनीय काल अचूक दिले आहेत . अन्य गणित हे असेच अचूक दिले आहेत, पण या वैज्ञानिकाचे जीवन चरित्र मात्र अन्य ऋषीमुनी प्रमाणे अज्ञातच राहिले आहे, तरी त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाची अनुभूती आधुनिक शास्त्रज्ञांना प्रकर्षाने येत आहे 15 एप्रिल 1975 साली 1500 व्या जयंतीचे निमित्ताने आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला गेला.


<< मुख्यपृष्ठ