जन्म 30 नोव्हेंबर 1858 ( विक्रमपूर बंगाल) मृत्यू 23 नोव्हेंबर 1937 (गिरिती बंगाल) 78 वर्ष
ढाका जिल्ह्यातील विक्रमपूर परगण्यात फरितपूर या गावी दिनांक 30 नोव्हेंबर 1858 साली जगदीश चंद्रांचा जन्म झाला. लहानपणी भगवान चंद्रांनी जगदीशच्या वडिलांनी एक अटल गुन्हेगाराला कारावासाची शिक्षा दिली होती व पुढे त्यालाच त्यांनी आपल्या घरी नोकर म्हणून ठेवले. त्याने लहानपणी बुद्धिमान जगदीशला आपल्या पूर्व जीवनातील चित्त थरारक आठवणी वन्य जीवन, पशुपक्षी , वनस्पती यांच्या गोष्टी सांगितल्या सभोवताच निसर्गप्रेमी जगदीशचे मन वन्यजीवनाने भारून गेले व पुढे ते निसर्ग निरीक्षक बनले. कलकत्त्याला त्यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. जीवशास्त्र व वनस्पतीशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांनी खाईष्ट कॉलेजमध्ये नाव नोंदवले 1884- 85 सालात ते केंब्रिज व लंडन विद्यापीठाचे पदवीधर झाले, त्यांचे प्रारंभिक संशोधन विद्युत लहरींचे होते एका प्रयोगात त्यांनी 75 फूट अंतरावर असणारी घंटा मध्ये तीन भिंती असताना विद्युत लेण्यांच्या साह्याने वाजून दाखवली. मार्कोनीचे नोबेल प्राईज त्यांना मिळाले असते पण परतंत्र भारतात त्यांना आर्थिक साह्यासाठी शासनाची मदत मिळाली नाही. त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले. पॅरीस येथील जागतिक विज्ञान परिषदेत त्यांनी सजीव आणि निर्जी यातील साम्य या विषयावर आपला प्रबंध वाचला त्यामुळे पुढे रडारचा शोध पाश्चात्य वैज्ञानिकांनी लावला जगदीश चंद्रांनी एका प्रयोगात एक पान, एक गाजर व एक नवलकोल यात सौम्य विद्युत प्रवाह सोडला व वनस्पती मधून उमटणारी प्रतिक्रिया अभ्यासली व प्राण्याप्रमाणे वनस्पतींनाही संवेदना असते हे सिद्ध . क्लोरोफॉर्म मुळे वनस्पतींना गुंगी येते, मुळाशी मद्य ओतलं तर पाणी उत्तेजित होतात. विषप्रयोगाने रोपटी मारतात.
वनस्पती विश्वात संशोधन करताना लागणारी अत्यंत तरल संवेदनाक्षम काटेकोर अचूक वेध घेणारे उपकरणे त्यांनी स्वतः तयार केली होती, कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था काढली. 27 नोव्हेंबर 1937 साली या विज्ञाननिष्ठ कर्मयोग्याने जगाचा निरोप घेतला तेव्हा वृक्षवेलींनी दुःखाचे निश्वास सोडले.


<< मुख्यपृष्ठ