t delightfulheart: जेवणाचे मूलमंत्र

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

जेवणाचे मूलमंत्र

 


*आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते!*-----


*१. अजिर्णे भोजनम् विषम्*

आधी घेतलेले भोजन पचले नसेल त त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते. कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये.


*२. अर्धरोगहारी निद्रा*

योग्य निद्रा अर्धे रोग घालवते.


*३. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।*

सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते. इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात.


*४.बागनास्थी संधानकारो रसोनहा।*

लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात.


*५.अति सर्वत्र वर्जयेत*

कशाचेही अति प्रमाणात सेवन/खाणे टाळावे.


*६. नास्थिमूलम अनौषधाम।*

औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेतच.


*७. नां वैध्यः प्रभुरायुशाह ।*

कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत.


*८. चिंता व्याधि प्रकाश्य।*

चिंता आरोग्याची वैरी असते.


*९. व्यायामच्छ शनैही शनैही।*

व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये. High Intensity Workout आयुष्य कमी करते.


*१०.अजावथ चर्वनाम कुर्यात।*

अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते.


*११. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम।*

आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते.


*१२. ना स्नानम आचारेठ भुक्थवा।*

भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. त्याचा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.


*१३. नास्थि मेघासमाम तोयम।*

पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते.


*१४. अजीर्णे भेषजम वारी।*

अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.


*१५. सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम।*

ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत. (नोकरांना कामावरून काढू नये, त्यांची कामे बदलावी.)


*१६. नित्यम् सर्वा रास्सभ्याश।*

एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात.


*१७. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि*  .

पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव पोट रिकामे असावे!

🙏🙏🙏🙏🙏🙏